मजकुराकडे जा
कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण मंडळफोंडा, गोवा
कविता

मुलगी झाली म्हणून

लेखक: अंजली अमर प्रभू तेंडुलकर · १९ नोव्हेंबर, २०२६ · 1 मिनिटे वाचन

आई आणि तिची लहान मुलगी

मुलगी झाली म्हणून
लोकहो नाक का मुरडता?
स्त्री पुरुष समानतेचे दाखले देता
स्वतः मात्र मुलगाच झाला पाहिजे
असा अट्टाहास धरता

जरा जागे होऊन पहा
काही दिसतो का फरक
मुलगा आणि मुलगी यांच्यात
कोण आहे जास्त सरस

मुलीचा समजूतदारपणा प्रत्येकाकडे
असतोच असे नाही
अपवाद काही सोडले तर
हे चित्र बदललेले दिसत नाही

मुलगी नको म्हणता खर
तिच्याशिवाय जग चालेल का?
सगळ्यांनाच मुलगा झाला तर
तुमचा वंश पुढे वाढेल का?

विज्ञानाने प्रगती केली
जग कुठून कुठे पोचलय
अजूनही मात्र नवीन जीव
मातेच्याच उदरात जन्म घेतोय

मुलगा काय मुलगी काय
शेवटी आपलाच अंश असतो
संस्कार, शिक्षणाचा ठेवा द्यावा
शेवटी आयुष्याभर हा ठेवाच
सोबत करतो

मान्य आहे तुमच्यामते
मुलगाच वंशाचा दिवा असतो
पण मुलगीच नसेल तर
हाच दिवा अंधारात भटकत रहातो

बायको सोडून सगळ्या मुली
स्वत:च्या आयाबहिणी समजूया
मुलगा मुलगी भेदभाव करन
आपणच सोडून देऊया
प्रत्येक मुलगी सुरक्षित राहील
यासाठी ठोस पावल उचलूया

शेअर करा: व्हॉट्सॲप फेसबुक