निवड जोडीदाराची
लेखक: अंजली अमर प्रभू तेंडुलकर · १८ नोव्हेंबर, २०२६ · 2 मिनिटे वाचन

आज एखाद्या मुलामुलीच लग्न ठरवण किंवा होण खुप कठीण होऊन बसलय, नाही आपणच ते कठीण करून ठेवलय अस म्हणायला हरकत नाही.
पूर्वीच्या काळी लग्न घरातील मोठे ठरवत आणि मुलगा असो वा मुलगी मोठ्यांच्या निर्णयाला विरोध करत नसत. तेव्हा जास्त करून लग्न वेळेवरही व्हायची अणि टिकायचीही. पण आता त्याच्या उलट परिस्थितीती निर्माण झाली आहे. एक तर लग्न वेळेवर होता होत नाहीत आणि झालीच तर ती टिकतानाही दिसत नाहीत, यालाही काही अपवाद असतात म्हणा. जे मनापासून तडजोड करून आपला संसार जोडून ठेवतात.
माझा स्वतःचा अनुभव
माझ स्वतःचच उदाहरणच घ्या ना. माझ लग्न ठरविण्यास माझ्या वडिलांनी माझ्या वीसाव्या वर्षीच सुरुवात केली. आमच्या फारशा काही अपेक्षाही नव्हत्या. मुलाच स्वतःच घर असाव आणि त्याला काहीतरी पोटापाण्यासाठी नोकरी धंदा असावा. कित्येक स्थळ आली गेली पण माझ लग्न काही ठरत नव्हत. वडिलांना टेन्शन आल होत हीच कस होणार, कारण मला स्थळ शोधण्यास सुरुवात करून नऊ वर्षे पूर्ण झाली तरी माझ घोड काही गंगेत न्हाईना. अशातच एक दिवस अचानक एक स्थळ आल आणि हासभास नसताना चार दिवसात माझ लग्न ठरल.
अपेक्षांचे ओझे
हे एवढ सगळ पाल्हाळ लावायच कारण एकच आज मुलगा मुलगी दोघेही उच्च शिक्षित, स्वतः कमावणारे मग त्यांच्या आपल्या जोडीदाराबाबतच्या अपेक्षाही उंचावतात. केवळ त्यांच्याच नाही त्यांच्या पालकांच्याही भरमसाट अपेक्षा असतात. प्रत्येकाला या ओझ्याखाली दबण जमत नाही आणि त्यामुळे खुपशी लग्न जमता जमता रहातात, ठरलेली लग्न ही मोडलेली मी पाहिली आहेत.
आमच्याच एका आईवडीलांचा एकच मुलगा असलेल्या नातेवाईकाचे लग्न ठरवायला गेलो असता मुली बघायला गेल्यावर तीची आईच म्हणते की माझ्या मुलीला लग्न झाल्यावर ती कुठे जाते काय करते काही विचारायच नाही, तीला कामाची सवय नाही, ती नोकरी करते तीला जेवन करता येत नाही, ती उच्च शिक्षित आहे. एवढे कमवते मग कामाला बाई ठेवा आणि हे कमी की काय म्हणून मुलाशी एकांतात बोलताना मुलींने लग्ना आधी शहरात फ्लॅट घे आपण लग्नानंतर तीथे रहायच. ह्या थोड्याशा अटी मान्य असतील तर आपण पुढे जाऊ असे म्हटले. या यांच्या थोड्या अटी. शेवटी लग्न काही ठरलच नाही कारण हा एकूलता एक मुलगा आईवडीलांना सोडून रहायला तयार नव्हता. त्याच लग्न अजूनही झाल नाही.
कुणाला आपल्यापेक्षा जास्त कमवणारा जोडीदार पाहिजे, तर कुणाला वयातील अंतर एक दोन वर्षेच असणारा, कुणाला अतिसुंदर तर कुणाला झीरोफीगर असाणारी जोडीदार म्हणून पाहिजे ह्या आणि अशा कित्येक अपेक्षा ज्या सगळ्याच काही पूर्ण होत नाहीत आणि यांची लग्न ही ठरत नाहीत. वय मात्र वाढत जात आणि शेवटी हातात काहीच उरत नाही. शेवटी मिळत त्यात समाधान मानाव लागत. आज आधीच वयाची मर्यादा कमी झाली आहे आणि नोकरी, शिक्षण याकारणाने लग्नाचे वयही वाढलेले दिसते.
काय लक्षात ठेवावे
यासाठी वेळीच सावध होण गरजेच आहे. पैसा नोकरी सगळ गरजेच आहेच मात्र तुमच्यासोबत तुमचा जोडीदारच नसेल तर तो पैसा, हुद्या काय कामाचा. कारण बाकीची सगळी नाती कायमची साथ करतीलच असे नाही मात्र आपला योग्य जोडीदार योग्य वेळी निवडला, थोडी त्यांने थोडी तुम्ही तडजोड केली तर तो शेवटपर्यंत तुमची साथ सोडत नाही. याची खात्री मी देते. केवळ वरवरच्या रंगरंगोटीला न भुलता, तुमच्या जोडीदाराकडे पैसा, प्राॅपटी किती आहे, हे न पाहता त्याचा स्वभाव, काहीतरी करण्याची जिद्द याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.
लेख मधील आणखी लेख

आपली हिंदू संस्कृती - टिकली
लेखक: अंजली अमर प्रभू तेंडुलकर · १७ नोव्हेंबर, २०२६
कपाळावरची टिकली हा आपल्या संस्कृतीचा एक छोटासा पण महत्त्वाचा भाग आहे. ती जपणे का गरजेचे आहे, याबद्दलचे एक मनोगत.

